मध्य रेल्वेतील सहा आरपीएफ निरीक्षकांना सहायक सुरक्षा आयुक्तपदी पदोन्नती
खान्देश लाईव्ह | ६ नोव्हेंबर २०२२ | मध्य रेल्वेतील सहा आरपीएफ निरीक्षकांना सहायक सुरक्षा आयुक्तपदी पदोन्नती नुकतीच प्राप्त झाली आहे. त्यात भुसावळातील तत्कालीन निरीक्षक गोकुळ सोनोनी, जुबेर पठाण, अजय यादव यांचाही समावेश आहे. गुरूवारी रात्री पदोन्नतीचे आदेश निघाले आहेत.
गोकुळ सोनोनी यांची सोलापूर ते बरोनी, जुबेर पठाण मुंबई ते आसाम आयजींचे रीडर, अजय यादव यांची मुंबई ते लॉमडींग (आसाम), अजरती माने, पुणे ते गया, देवानीश लाकडा, पुणे ते न्यु.जलपैगुडी (आसाम) यांचा समावेश आहे. यातील सोनोनी, यादव, पठाण या अधिकार्यांनी भुसावळ रेल्वे स्थानक निरीक्षक म्हणून काम केले आहे. भुसावळ येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या आयुक्तांची जागा रिक्त आहे, मुंबई येथील आयुक्तांकडे येथील अतिरीक्त पदभार आहे. शहरासाठी कुणाची नियुक्ती होते? याकडे अधिकार्यांचे लक्ष लागले आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम