फैजपूर येथील पांडुरंगाच्या रथोत्सवाला १७४ वर्षांची परंपरा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ७ नोव्हेंबर २०२२ | पांडुरंगाच्या फैजपूर येथीलरथोत्सवाला १७४ वर्षांची परंपरा आहे. कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वयंभू श्री पांडुरंगाचा रथोत्सव आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत होत आहे. दुपारी तीन वाजता मुख्य विश्वस्त गादिपती खुशाल महाराज यांचे पाचवे वंशज ह.भ.प.पुंडलिक महाराज यांच्या हस्ते ब्रह्म वृंदाच्या उपस्थितीत महापूजा होणार आहे.

खुशाल महाराज की जय या घोषणांनी स्वयंभु पांडुरंगाची मूर्ती उचलून नगर प्रदक्षिणेसाठी मूर्ती रथात स्थानापन्न करण्यात येईल,याप्रसंगी ब्राह्मणवृंद मंत्रघोष करतील,मंत्रघोष झाल्यानंतर महाआरतीचे यजमान म्हणून मनीष कृष्णरावशेठ माहुरकर सपत्नीक यांच्या हस्ते मिरवणुकीच्या दुपारी 3.30 मिनिटांनी महापूजा होईल, नगर प्रदक्षिणेसाठी रथोत्सव श्री खुशाल महाराज की जय या घोषणांनी प्रारंभ होईल, रथोत्सवास सुरुवात रथ गल्लीतून होणार असून लक्कड पेट, मारुती गल्ली,सुभाष चौक, खुशाल भाऊ रोड,जुन्या हायस्कूल मार्गे, ब्राह्मण गल्ली मार्गे, रथ निघेल रथ गल्ली मित्र मंडळ,यावर रावेर तालुक्यातील वारकरी भजनी मंडळ,फैजपूर ग्रामस्थ, इस्कॉन भजनी मंडळ यात सहभागी होतील, तसेच संध्याकाळी सात वाजता सुभाष चौकात पांडुरंगाच्या रथोसत्वाचे आगमन झाल्यावर महाआरती सामाजिक कार्यकर्ते विक्की जयस्वाल यांच्या हस्ते होईल, यावेळी उत्कृष्ट रांगोळी कलाकार शिक्षक राजू साळी, विद्यार्थिनी साक्षी पाटील, आर्या साळी यांच्या हस्ते 30 बाय 30 आकाराची ची महारागोळी काढण्यात येणार आहे, या रांगोळी साठी 40 किलो रांगोळी,20 किलो फुलांच्या पाकळ्या तर लाकडांचा भुसा वापरण्यात येणार आहे,

रथगल्ली मित्र मंडळ्यांच्या सदस्यांनी पांडुरंगाच्या रथाचा उत्सव साजरा करण्यासाठी कामाची लगबग सुरु केली आहे. रथ ज्या मार्गाने जाईल तेथे विजतारांना अडथळा येणार नाही त्याची ही दक्षता इलेक्ट्रिक बोर्डाचे जुनिअर इंजिअर व त्यांचे सहकारी संदीप कोळी, पंकज पाटील, तसलीम तडवी, हेमंत चौधरी, हर्षवर्धन तळेले, जुम्मा तडवी आरिफ तडवी, आकाश ठोंबरे, हबीब तडवी सह जातीने लक्ष ठेऊन आहे. रथोत्सवासाठी ए.पि.आय सिद्धेश्वर आखेगावकर व त्यांचा पोलीस स्टाफ, होमगार्ड समाद्धेश अधिकारी विकास कोल्हे, होमगार्ड श्रीकांत इंगळे, संजय कोल्हे व स्टाफ चोख बंदोबस्त ठेऊन आहेत. भाविभक्त गणांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन खुशाल महाराजांचे सहावे वशज ह.भ. प.प्रवीण महाराज यांनी केले आहे.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like