खेडी येथील विवाहितेचा ५० हजारांसाठी छळ

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ७ नोव्हेंबर २०२२ | पैशांसाठी मानसिक, शारीरिक छळकेल्याने खेडी बुद्रुक येथील माहेर असलेल्या २२ वर्षीय विवाहिते पतीसह सासु-सासरे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरापासून जवळ असलेल्या खेडी बुद्रुक येथील विनायक नगरातील माहेर असलेल्या रोशनी आकाश इंगळे (वय-२२) यांचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील माळेगाव येथील आकाश मनोहर इंगळे यांच्याशी रीतीरीवाजा नुसार जुलै-२०१९ मध्ये झाला. पती आकाश इंगळे याने विवाहितेला माहेरहून ५० हजार रुपये आणावे, अशी मागणी केली. विवाहितेने माहेरहून पैसे आणले नाही, याचा राग आल्याने पती आकाश इंगळे हिने याने विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच दमदाटी करून मानसिक व शारीरिक छळ केला. पती आकाश मनोहर इंगळे, सासू बेबाबाई मनोहर इंगळे आणि सासरे मनोहर नारायण इंगळे सर्व रा. माळेगाव जि. बुलढाणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक सुनील सोनार पुढील तपास करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like