आता लवकरच होणार राज्यातील पोलीस भरती
खान्देश लाईव्ह | ७ नोव्हेंबर २०२२ | पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. राज्यात शिंदे- फडणवीस सरकारकडून काही दिवसांआधी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. मात्र ही भरती स्थगित कऱण्यात आली होती. मात्र आता राज्यात पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील अनेक वर्तमान पत्रांमध्ये या संबंधीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. डीजी ऑफिसमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी संजीव कुमार यांनी माहिती दिली की, राज्यभरात 18 हजार 331 पोलिसांची भरती होणार आहे.
तसंच नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत सर्व उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या पदभरतीमध्ये आधी शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीची तयारी केली आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
यंदा असलेल्या पोलीस भरतीमध्ये हजारो रिक्त पदे भरण्यात येणार होती. मात्र कोरोना काळात ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे अशा उमेदवारांना या भरतीत जागा मिळेल का यावर प्रश्नचिन्ह होतं. अशा उमेदवारांनी सरकारकडे दादही मागितली होती. त्यामुळेच आता सरकारनं आणि गृहविभागाने मोठा निर्णय घेत अशा उमेदवारांना पोलीस भरतीची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम