खा.राहुल गांधी यांचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १९ नोव्हेंबर २०२२ | गेल्या चार दिवसांपासून वाशिम, अकोला व बुलढाणा जिल्ह्याच्या भारत जोडो पदयात्रेमध्ये युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे हे सहभागी होते. .पदयात्रा अकोला जिल्ह्यामध्ये सुरू असताना पहाटेच्या अत्यंत सुंदर वातावरणामध्ये आपल्या आयुष्यामधील अत्यंत अविस्मरणीय व ऐतिहासिक असा क्षण म्हणजेच काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांच्या हातात हात घालून पदयात्रेमध्ये सहभागी होऊन त्यांची भेट घेऊन विविध विषयांवरती केलेली चर्चा

 

आपल्या दृष्टीने संपूर्ण जिल्ह्यातील युवकांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी असल्याची माहिती युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दिली. खा.राहुल गांधी व जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या भेटीचा दुवा ठरले प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले… खासदार राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेमध्ये चालत असताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची नजर पडली ती युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यावरती व लगेच त्यांनी मराठे यांच्या खांद्यावर हात ठेवून खा. राहुल गांधी यांच्याशी ओळख करून दिली व मराठे यांना राहुलजींसोबत चालण्यास सांगितले.

संघर्ष कर… एक दिवस तुझाच येईल..!!खा.राहुल गांधींनी केल्या प्रेरणादायी मार्गदर्शक सूचना खा.राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेमध्ये चालत असताना युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी विविध विषयांवरती खा.राहुल गांधी यांचे लक्ष वेधले. मराठे यांनी स्वतःचा ओळख परिचय देताना चार वेळेस एन एस यु आय चे जिल्हाध्यक्ष पद भूषवले असताना त्या कालखंडामध्ये त्यांनी विद्यापीठांमधील संघ विचारधारेशी कशा पद्धतीने लढाई लढली.त्याच पद्धतीने विद्यापीठांमधील संघ विचारधारेच्या लोकांनी मराठे यांचा आवाज दाबण्याकरता त्यांच्यावरती एक कोटी रुपयांची अब्रू नुकसानीचा दावा देखील दाखल केला व तरीदेखील ते कुठल्याही दबावाला बळी न पडता सतत विद्यापीठांमधील गैर कारभाराबद्दल आवाज उठवला व या संपूर्ण गैर कारभारामुळे कशा पद्धतीने कुलगुरू यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला

याबाबतची संपूर्ण माहिती त्यांनी खा. राहुल गांधी यांना दिली. खा राहुल गांधी यांनी देखील केले अभिनंदन..खा. राहुल गांधी यांनी देखील मराठे यांच्याशी बोलताना काही मार्गदर्शक सूचना देखील केल्या खा. राहुल गांधी म्हणाले की, ज्या पद्धतीने मी लोकांच्या मनामधील वेदना जाणून घेण्याकरता रस्त्यावरती उतरलेलो आहे व लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याच पद्धतीने आपण देखील जिल्ह्यातील प्रत्येक युवकांपर्यंत पोहचा त्यांच्या मनातील खदखद ओळखा आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांच्यापर्यंत आपल्या काँग्रेस पक्षाचा विचार देखील पोहोचविला गेला पाहिजे याची देखील काळजी घ्या.. आगामी काळ सर्व स्तरातील युवकांना न्याय मिळवून देण्याचा आहे. संघर्षासाठी मागे पुढे बघू नको.. विरोध होईल.. परंतु संघर्ष कर.. एक दिवस तुझाच येईल..! या पद्धतीचे अत्यंत मायेचे व प्रेरणादायी असे मार्गदर्शन खा.राहुल गांधी यांनी मराठे यांना केले.

भारत जोडो पदयात्रेमध्ये भारत जोडो पदयात्रेमध्ये खा.राहुल गांधी यांच्यासोबत चालत असताना, खा. राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर खा. राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी झालेली अभिनेत्री रिया सेन यांचे देखील जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी अभिनंदन केले व सांगितले की कुठल्याही दबावाला बळी न पडता आपण खा. राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो.. नफरत छोडो या मोहिमेमध्ये सहभागी झाल्याबद्दल व

आमचे नेते खा. राहुल गांधी यांना पाठिंबा दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार व अभिनंदन या पद्धतीची चर्चा जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठी यांनी अभिनेत्री रिया सेन यांच्यासोबत देखील केली. भेटीमुळे उत्साह वाढला जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांची प्रतिक्रिया कुठल्याही पक्षामध्ये काम करत असताना कार्यकर्त्याची अपेक्षा असते की पक्षाच्या आपल्या नेत्याची भेट व्हावी व त्यांच्याशी चर्चा करावी.

 

त्याच पद्धतीने भारत जोडो या मोहिमेमध्ये सहभागी होत असताना युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांच्यासोबत एक अविस्मरणीय,लक्षवेधी व ऐतिहासिक भेट घेतली.या भेटीमुळे उत्साह वाढला. तसेच खा. राहुल गांधी यांनी भारत जोडो या मोहिमेच्या अंतर्गत आम्हा युवकांचे भविष्य उज्वल करण्यासाठी जी पदयात्रा सुरू केलेली आहे. त्यानिमित्त खा.राहुल गांधी यांचे देखील त्यांनी आभार मानले…

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like