डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातओटी निर्जंतुक प्रक्रियेवर कार्यशाळा
खान्देश लाईव्ह | १९ नोव्हेंबर २०२२ | डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मुख्य ऑपरेशन थिएटरच्या लॉबीमध्ये ‘ओटी निर्जंतुक प्रक्रिया (षेससळपस) व त्यासाठी वापरण्यात येणारे लिक्विड (वळीळपषशलींरपीीं) कसे वापरावे’ यावर शुक्रवार दि.१८ नोव्हेंबर रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
ही कार्यशाळा डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजी एचआयसीसीअंतर्गत आयोजित केली. एचआयसीसी म्हणजे हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल कमिटी ही समिती हॉस्पिटलमध्ये विस्थापित होणारे विषाणू व जिवाणूंचा प्रादुर्भाव कसा रोखावा याबाबत मार्गदर्शन करते. एचआयसी समिती ही गेल्या पाच वर्षापासून हॉस्पिटलमध्ये सदैव कार्यरत आहे.यावेळी मुंबई हून आलेले मायक्रोजेन कंपनीचे मनोज सिंग ( वशोपीीींरीेीं ) व डॉ.कैलास वाघ (विभागप्रमुख, मायक्रोबायोलॉजी) यांनी उपस्थीत नर्सिंग स्टाफ व ओटी इंचार्ज, डॉक्टर्स व इंर्टन्स यांना मार्गदर्शन केले.
ओटी कशी निर्जंतुक करावी ह्याचे प्रात्याक्षिक करुन घेतले.कार्यशाळा आयोजित करण्यास डॉ.उल्हास पाटील महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मायक्रोबायोलॉजी विभागाचे विभागप्रमुख डॉ.कैलास वाघ, सहाय्यक डॉ.प्रशांत गुडेती, मि भवानी वर्मा, मि बिटोपन दास, ओटी मॅनेजर निखील चौधरी, ओटी इंचार्ज दिप्ती राऊत या सर्वांनी परिश्रम घेतले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम