ज्येष्ठ अभिनेत्री, निवेदिका तबस्सूम यांचे निधन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २० नोव्हेंबर २०२२ |  सत्तरच्या दशकात दूरदर्शनवर गोड हसरा चेहरा आणि आपल्या मधाळ आवाजातील निवेदनाने ‘फुल खिले है गुलशन गुलशन’ हा कार्यक्रम गाजवणाऱ्या अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबियांनाही धक्का बसला आहे. दरम्यान, २१ नोव्हेंबर रोजी मुंबईतील सांताक्रूझ येथे त्यांच्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यांचा मुलगा होशांग गोविल यांनी त्यांच्या आईच्या निधनाचे वृत्त दिले. ‘काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना गॅस्ट्रोची समस्या होती आणि आम्ही तपासणीसाठी गेलो होतो. त्यांना रात्री ८.४० आणि ८.४२ वाजता वाजता दोन हृदयविकाराचे झटके आले.

तबस्सुम या प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘रामायण’मध्ये रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांच्या वहिनी आणि आणि विजय गोविल यांच्या पत्नी आहेत. तबस्सुम यांनी टॉक शोच्या होस्ट म्हणून विशेष लोकप्रियता मिळवली. तबस्सुम यांनी आपल्या करिअरची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली होती. त्यावेळी त्यांना प्रेमाने बेबी तबस्सुम म्हटले जायचे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like