भाजपचे गटनेते भगत बालाणी यांचे जात प्रमाणपत्र रद्द

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २० नोव्हेंबर २०२२ | भाजपचे गटनेते भगत बालाणी यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द ठरविल्याचे त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे.

महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे गटनेते भगत बालाणी यांनी निवडणूक लढवितांना जगियासी या जातीचे प्रमाणपत्र जोडले होते. यात त्यांनी आपण ओबीसी असल्याचे दर्शविले होते. हे प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करत चेतन शिरसाळे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

यावर औरंगाबाद खंडपीठाने जळगाव जिल्हा जात पडताळणी समितीने यावर निर्णय घेण्याचे सुचविले होते. तथापि, या समितीसमोर भगत बालाणी कागदपत्रे सादर करू न शकल्याने त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. यामुळे त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. या संदर्भात बालाणी यांनी निकाल हाती आल्यानंतर भाष्य करणार असल्याचे सांगितले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like