धमकी देऊन २ वर्षे केलेल्या अत्याचारातून मुलगी गर्भवती

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २० नोव्हेंबर २०२२ | अमळनेर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढून तिच्यावर सतत दोन वर्ष अत्याचार करण्यात आल्यानंतर पीडीता त्यातून गर्भवती राहिली व तिने पुरूष जातीच्या बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तरुणाविरोधात अमळनेर पोलिसात पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साडेसोळा वर्षीय पीडीतेच्या फिर्यादीनुसार, ती शिक्षण घेते व संशयीत आरोपी समाधान गुलाब पारधी याने लग्नाच्या आमिषाने तरुणीची सलगी वाढवली. अल्पवयीन तरुणी नववीला असताना तरुणाने तू मला आवडते, आपण लग्न करू दोघे पळून जाऊ, असे सांगितले. त्यावेळी मुलीने नकार देऊन मला शिकायचे असलयाचे सांगितले मात्र तरुणाने तू माझ्याशी प्रेमसंबंध कर अन्यथा तुझ्या आई वडिलांना मारून टाकेल, अशी धमकी दिली.

घाबरून मुलीने हो म्हटल्यावर समाधान याने पीडित मुलीचे आई-वडील शेतात आणि बहिणी शाळेत गेल्यावर तिच्याशी शारीरीक संबंध निर्माण केले. प्रेमसंबंध मुलीच्या आई-वडिलांना समजल्यावर त्यांनी मुलीचा साखरपुडा २६ जुलै २०२२ रोजी एका तरुणाशी करून दिला. ती १८ वर्षाची असताना लग्न करण्यात येणार होते. ९ नोव्हेंबर रोजी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात तपासणीला आणले डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगून अवघ्या सात महिन्यांची गर्भवती असताना तिची प्रसूती केली.

दरम्यान, तरुणीने पुरूष जातीच्या बाळाला जन्म दिल्यानंतर तरुणीने हे जन्माला आलेले बाळ जवळ ठेवायचे नसल्याने समितीच्या अश्विनी देसले यांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीनुसार समाधान गुलाब पारधी (रा.अमळनेर तालुका) याच्याविरोधात भाग पाच सीसीटीएनएस गुरनं. ११२/२ ०२२ भादंवि कलम ३७६ (२छ), ५०६ अपराधांपासु न संरक्षण अधि, २०१२ कलम ४,८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.निरीक्षक जयेश खलाणे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like