घरातील मोलकरणीवर अत्याचार ; गुन्हा दाखल
खान्देश लाईव्ह | २० नोव्हेंबर २०२२ | घरातील मोलकरणीवर घरमालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून याबाबत एमआयडीसी पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश पुंडलिक पाटील (रा. पहूर ता. जामनेर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
४८ वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे कि, दि. १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पिडीता घरात फरची पुसण्याचे काम करीत असतांना अचानकपणे प्रकाश पाटील हा मागून आला व त्याने पिडीतेला मागून पकडुन जोरात मिठी मारली. पिडीतेने विरोध केला असता जबरदस्ती तोंड दाबून जीवे ठार मारण्याची धमकी देत बलात्कार केला. तसेच याबाबत कुणाला सांगितले तर तुला व तुझ्या मुलाला जिवंत ठेवणार नाही, अशी पुन्हा जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी प्रकाश पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि प्रमोद कठोरे पुढील तपास करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम