होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. विलास महाजन यांचा गौरव
खान्देश लाईव्ह | २० नोव्हेंबर २०२२ | वैद्यकीय क्षेत्रात गेल्या 39 वर्षापासून अविरत वैद्यकीय सेवा केल्याबद्दल होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ.विलास महाजन यांचा सत्कार निर्मल सीड्सचे संचालक डॉ. सुरेश पाटील यांच्या हस्ते एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आला.
डॉ.विलास महाजन यांच्या वैद्यकीय सेवेला 39 वर्षे पूर्ण होऊन 40 व्या वर्षात पदार्पण केले .त्या निमित्ताने मॉर्निंग वॉक ग्रुपतर्फे साने गुरुजी कॉलनीजवळील इंद्रप्रस्थ कॉलनीत सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निर्मल सीड्सचे संचालक तथा जिल्हा बँकेचे माजी संचालक डॉ. सुरेश पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील , युको बँकेचे माजी व्यवस्थापक एम. एन. महाजन यांच्यासह सत्कारमूर्ती डॉ. विलास महाजन हे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. विलास महाजन यांचा सत्कार डॉ. सुरेश पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी डॉ. सुरेश पाटील म्हणाले की , डॉ. महाजन यांनी व्यासंगीवृत्ती जोपासून अविरतपणे वैद्यकीय सेवा सुरू ठेवली आहे. ही सेवा यापुढेही अखंडित राहिल अशा शब्दात त्यांनी डॉ. महाजन यांना शुभेच्छा दिल्या. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी डॉ. महाजन यांच्या वैद्यकीय सेवेचा गौरव करत ही सेवा त्यांच्या हातून अविरतपणे सुरू राहील आणि त्याचा फायदा गोरगरीब रुग्णांना होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
एम .एन. महाजन यांनीही आपल्या मनोगतात डॉ. महाजन यांच्या सेवेचा गौरव केला. त्यानंतर सत्काराला उत्तर देताना डॉ. विलास महाजन यांनी अविरत वैद्यकीय सेवा हे माझे ध्येय असल्याचे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ.सुधीर भटकर यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे माजी कार्यकारी व्यवस्थापक सुदाम पाटील कृषीतज्ज्ञ डॉ. संजीव एस. पाटील ,जैन इरिगेशनचे कृषीतज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील, डॉ.जे .आर .महाजन ,डॉ. सुदाम पाटील ,नितीन चिंचोले ,के.व्ही. महाजन ,आर.डी. महाजन,डॉ. गोपी सोरडे, नितीन काळुंखे ,गुलाबराव कोळी आदी उपस्थित होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम