चाळीसगावात चॉपर हल्ला ; तीन जण जखमी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २० नोव्हेंबर २०२२ | एकावर चॉपरने हल्ला करुन, त्या गंभीर तर दोन जण जखमी झाल्याची घटना शहरातील घाट रोडवरील छाजेड ऑईल मिल पाठीमागे भागात घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

शहरातील घाट रोडवरील छाजेड ऑईल मिलच्या पाठीमागे माजी नगरसेवक अण्णा कोळी यांच्या घरासमोर वैभव अरूण रोकडे, भूषण रघुनाथ मंजाळ, आणि सौरव आंनदा कोळी हे उभे असतांना त्याठिकाणी रात्रीच्या ११ वाजेच्या सुमारास हैदरअली असीफ अली, नदीम खान साबीर खान उर्फ गोल्डन, सुलतान शेख रहेमान शेख वाजिद खान, साबीर खान, नवाज (पूर्ण नाव माहित नाही.) आणि त्यांच्यासोबत दोन अनोळखी इसम त्याठिकाणी आले.

यातील हैदर अली याने त्यांना तेथे पाहातचं इनको आज जिंदा मत छोडो असे म्हणून वरील सर्वांनी तिघांवर हल्ला चढविला. या हल्लयात हैदर अली याने त्याच्या हातातील चॉपरने भूषण मंजाळ याच्या पेाटावर वार केला, वार अडवतांना भूषण याच्या उजव्या मांडीवर लागला, तर अन्य आरोपींनी ही लाकडी दांडक्याने मारहाण केली. या हल्ल्यात भूषण मंजाळसह वैभव रोकडे, सौरव कोळी असे तिन्ही जखमी झाल्याची तक्रार वैभव रोकडे यांनी शहर पोलिस स्टेशनला दिल्यावरून हैदर अलीसह वरील सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्यामार्गदर्शनाखाली सागर ढिकळे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like