पारोळा तालुक्यात चोरट्यांचा उच्छाद ; बहादरपूर , शिरसोडे येथे ७ घरे फोडली

खान्देश लाईव्ह | २० नोव्हेंबर २०२२ | एकाच रात्री सात ठिकाणी घरफोडी झाल्याचा प्रकार पारोळा : तालुक्यातील बहादरपूर, शिरसोदे येथे उघडकीस आला असून ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.
रात्री अडीच-साडेतीनच्या दरम्यान काही संशयितांनी बहादरपूर येथे रात्री प्रवेश केला. त्यानंतर शिरसोद्यात मोर्चा वळविला. अशी एकापाठोपाठ सात घरे फोडली. थंडी जास्त असल्याची संधी साधून चोरांनी डल्ला मारला. यात बहादरपूर येथील तीन आणि शिरसोद्यातील चार घरे त्यांनी फोडली आहेत. यामध्ये बहादरपूर येथील माजी सरपंच भिकन चौधरी, उपसरपंच राजेंद्र माकडे, डॉ. विशाल बडगुजर तर शिरसोद्यातील माजी ग्रामपंचायत सदस्य जयकुमार पाटील, बडगुजर, दुकानदार मुसळे आणि मालचे यांच्या घरातून चोरट्यांनी डल्ला मारला. चोरट्यांनी बंद घरांनाच लक्ष्य केले आहे.
पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी तत्काळ जळगावला भ्रमणध्वनीवर संपर्क साधून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. श्वानपथकाने रस्त्यापर्यंत मार्ग दाखवला. या वेळी डॉ. विशाल बडगुजर यांच्या दवाखान्याचे कडी-कोयंडा तोडून, हरिश्चंद्र मुसळे यांचे किराणा दुकान, राजेंद्र वाणी, निवृत्त शिक्षक जयकुमार पाटील, सुरेश मालचे सुनील चौधरी यांचे बंद घराचा फायदा घेत चोरट्यांनी रोकडसह दागिने लंपास केल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी हरिचंद्र मुसळे (बहादरपूर) यांनी पारोळा पोलिसांत फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल झाला.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम