विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ पतीसह सासू व सासरावर गुन्हा दाखल
खान्देश लाईव्ह | २५ फेब्रुवारी २०२२ | माहेरहून ५० हजार रुपये घेऊ येण्याकरीता विवाहितेचा केला जात होता शारीरिक व मानसिक छळ. पतीसह सासू व सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
श्वेता राजा हरित (वय-४०) यांचा विवाह वसंत नगर वसई, मुंबई येथील राजा ब्रह्मानंद हरित यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या सुरुवातीला एक आठवड्यानंतर पती राजा ब्रह्मानंद हरित यांनी माहेरहून ५० हजार रुपये आणावे यासाठी बायकोला शिवीगाळ व मारहाण केरत असे.
विवाहिता यांनी ५० हजाराची सोय न केल्यामुळे पती राजा हरित यांनी शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास देत होता. यामध्ये सासू आणि सासरे यांनी देखील सामिल होते. हा छळ सहन न झाल्याने विवाहिता या जळगाव येथील महाबळ येथे माहेरी निघून आल्या. माहेरच्या कुटुंबीयांनी वेळ न दवडता पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
जळगाव शहरातील महाबळ परिसरातील विवाहितेचे माहेर आहे. यासंदर्भात गुरुवार २४ फेब्रुवारी रोजी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पतीराजा ब्रह्मानंद हरित, सासु माया ब्रह्मानंद हरित, सासरे ब्रह्मानंद शामदेव हरित सर्व रा. वसंत नगर, वसई पूर्व, मुंबई यांच्या विरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलिस कर्मचारी रत्ना मराठे करीत आहे
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम