महात्मा फुले मार्केटातील शौचालयाचा शुल्क फलक
महात्मा फुले मार्केटातील शौचालयाचा शुल्क फलक
शहरातील महात्मा फुले मार्केट येथे मोफत असणाऱ्या मुतारी मध्ये लघवीसाठी जाणाऱ्या पुरुष व महिलांकडून २ रु सक्तीने वसुल करण्यात येत होते. याबाबत माणुसकी समूहाने तक्रार दाखल करताच चक्क एका तासात फलक लागले.
24 फेब्रुवारी जळगाव येथे महात्मा फुले मार्केट हे कपडासाठी प्रसिद्ध आहे. येथे जीवनावश्यक वस्तू पासून तर संसार उपयोगी सर्व साहित्य या ठिकाणी मिळतात त्यामुळे हा परिसर सतत गर्दीने हा गजबजलेला असतो. परंतु बाजारात नागरिकांना काही मोफत सेवा उपलब्ध आहे. जसेकी शौचालयचा वापर करणे .
माणुसकी रुग्णसेवा समूहाचे जिल्हा उपाध्यक्ष चेतन पाटील हे कपडे खरेदीता महात्मा फुले मार्केटमध्ये गेले होते. फुले मार्केट येथे मोफत असणाऱ्या मुतारी मध्ये लघवीसाठी जाणाऱ्या पुरुष व महिलांकडून २ रु सक्तीने वसुल करण्यात येतात. तसेच सुट्टे पैसे नसेल तर आत जाण्यास मनाई करतात. त्या ठिकाणी संडास व अंघोळीसाठी किती शुल्क आकारले जाते याचा कोणताही फलक नव्हता.
सर्व प्रकार लक्षात घेता चेतन पाटील यांच्या लक्षात येताच माणुसकी समुहाच्या टीमने जळगाव महानगर पालिका महापौर सेवा कक्ष येथे संपर्क करून तक्रार दाखल केली. त्याची दखल घेऊन तात्काळ तेथे फलक लावण्यात आला. माणुसकी टीमने महापालिकेने सुरू केलेले महापौर सेवा कक्ष यांचे धन्यवाद मानले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम