महाविकास आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ताकडून सरकार व केंद्रीय यंत्रणेचा निषेध पोलिसांत जाहिर केले निवेदन
खान्देश लाईव्ह | २५ फेब्रुवारी २०२२ | जळगाव शहरात रावेर तालुक्यातील खिर्डी येथे केंद्र सरकार व केंद्रीय यंत्रणेचा निषेधार्थ महाविकास आघाडी पदाधिकारी व कार्यकर्तातर्फे निंभोरा पोलिसांत निवेदन देण्यात आले.
रावेर तालुक्यात खिर्डी येथे निषेधार्थ निवेदन महाविकास आघाडीतील पदाधिकारी व सर्व घटकपक्ष आणि कार्यकर्त्यांतर्फे निंभोरा पोलिसांत देण्यात आले. यावेळी शिवसेना उप.तालुका प्रमुख विनोद पाटील, शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख सलमान शेख, जेष्ठ शिवसैनिक जाकीर सेठ, युवासेना भैय्या पाटील, खिर्डी खुर्द सरपंच राहुल फालक, खिर्डी बुद्रुक सरपंच, घनश्याम पाटील, लक्षीमण इंगळे,राहुल पाटील, अजगर शेख, वासुदेव पाटील, विजय पाटील, राजेंद्र पाटील, कय्युम शेख, फरीद शेख, अकील बेग आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले की, केंद्र सरकार विरोधकांना यंत्रणाचा गैरवापर करुन लोकशाही धोक्यात आणू पाहत आहे.सध्या देशात केंद्रीय यंत्रणा ‘ई.डी.’ चा केंद्र सरकारकडून सततने गैर वापर होत आहे. राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांवर, मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करुन त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणाच्या माध्यमातून दबाव आणण्याचे काम सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्यावर देखील सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे.
सध्या देशात केंद्रीय यंत्रणा ‘ई.डी.’ चा केंद्र सरकारकडून सततने गैर वापर होत आहे.राज्य मंत्री नवाब मलिक यांना कोणतेही समन्स न देता अटक करण्यात आली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकार अस्थिर ठेवण्याच्या हेतू ने राज्य मंत्र्यांवर खोटे आरोप करून तसेच केंद्र सरकारच्या पोलखोल करणाऱ्या नेत्यांच्या निर्भीड आवाजाला दाबण्याच्या प्रयन्त आहे. असून केंद्रीय यंत्रणेचा ‘ई.डी. चा होणारा गैर वापर न थांबल्यास पुढे केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल् असं स्पष्ट केले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम