भुसावळमध्ये अकरावीच्या विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २५ फेब्रुवारी २०२२ | येथील भुसावळ हुडको कॉलनीतील राहणारी १७ वर्षीय तरुणीन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली. घटनेच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.

भुसावळ शहरातील हुडको कॉलनीतील कोमल भगवान तायडे (17) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव.
नाहाटा महाविद्यालयाची अकरावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कोमल तायडे या युवतीने वरच्या मजल्यावर येऊन दोरीने गळफास घेतला. आईने मुलीस आवाज दिल्यावर ही तिने उत्तर दिले नसल्याने आई वरच्या मजल्यावर धाव घेतली, मुलीने गळफास घेतलेला पाहून तिच्या आईने हंबरडा फोडला. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्वरित परिसरात माहिती पसरताच या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात मिळालेल्या माहितीवरून पोलिस निरीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली. तर गजानन पडघन, सहायक फौजदार मोहंमद अली सय्यद, समाधान पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला. मृत कोमलचे पालिका रूग्णालयात विच्छेदन करण्यात आले.

कोमल ही युवती नाहाटा कॉलेजला अकरावीच्या विज्ञान शिक्षण घेत होती. तिचे वडील भगवान तायडे हे सुध्दा नाहाटा कॉलेजमध्येच नोकरीला आहे. कोमलच्या मागे दोन बहीणी, आई, वडील असा परीवार आहे. तिच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. कोणत्याही प्रकारची माहिती किंवा वस्तू आढळून आले नाही त्यामुळे अंदाज लावणे शक्य नाही.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like