रशिया – युक्रेनच्या युद्धामुळे कच्चा तेलाचे भाव गगनाला भिडले

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २५ फेब्रुवारी २०२२ | रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु झालेल्या युद्धाचे पडसाद संपर्ण जगभरात उमटत आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला करताच आंतराराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किंमती झपाट्याने वाढल्याचे यला मिळत आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या नव्या किंमती जारी केल्या आहेत. देशात इंधनाच्या किंमती वाढल्या तरी राज्याला आज दिलासा मिळाला आहे. कारण राज्यातील पेट्रोल डिझेलच्या किंमती आज कोणताही बदल घडलेला नाही. भारतात मागच्या वर्षभरापासून इंधानाच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. मात्र आता युद्ध सुरू झाल्यानंतर इंधनाच्या किंमतींचा चांगलाच विस्फोट झाल्याचे दिसत आहे.

मात्र महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील पेट्रोलच्या किंमती या १०० रुपयांच्या पार गेल्या आहेत. येत्या काही दिवसांत देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींत आणखीन वाढ होण्याची शक्यता. दुसरीकडे निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे या निवडणुकांच्या निकालानंतरच पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होईल असा अंदाजही वर्तवला जात आहे.

मुंबई, पुणे ते नाशिक पर्यंत जिल्ह्यांतील पेट्रोल डिझेलचे आजचे दर :

मुंबई
पेट्रोल – १०९.९८ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९४.१४ रुपये प्रति लीटर

ठाणे
पेट्रोल – १०९.५१ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९२.२८ रुपये प्रति लीटर

पुणे
पेट्रोल – १०९.७२ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९२.५० रुपये प्रति लीटर

नाशिक
पेट्रोल – ११०.४० रुपये प्रति लीटर
डिझेल – ९३.१६ रुपये प्रति लीटर

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like