75 वर्षीय महिलेवर अशक्य शस्त्रक्रिया पार पाडून देवकर रुग्णालयातील डॉक्टरांनी मिळवले यश
खान्देश लाईव्ह | २५ फेब्रुवारी २०२२ | गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात 75 वर्षीय महिलेवर अशक्य असलेली शस्त्रक्रिया पार पडली. रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांमुळे डॉक्टरांनी ही कामगिरी यशस्वी पार केली.
जळगाव शहरातील धरणगाव येथील 75 वर्षीय महिलेला एक महिन्यापासून पोटात त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांनी चोपडा येथील रुग्णालयात काही तपासण्यांवरुन तज्ञांनी लक्षात आले गर्भपिशवीची समस्या आहे. परंतु रुग्णाचे वय आणि पाठीच्या कण्याचा त्रासामुळे शस्त्रक्रियेसाठी भूल देण्याचे प्रयत्न दोनदा अयशस्वी ठरले. वयोवृद्ध रुग्णाला भूल देताना मोठे जोखमीचे काम होते. संबंधित रुग्णालयात आयसीयूची उपलब्धता नसल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी नकार व्यक्त केली. गर्भपिशवीची समस्यावर शस्त्रक्रिया हाच एकमेव पर्याय होता.
यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांना देवकर रुग्णालयात महिलेला ऍडमिट केले. गेल्या अनेक दिवसांपासून रुग्ण महिलेच्या पाठीच्या कण्याची समस्या, पायात एक वर्षापूर्वी टाकलेला रॉड व त्यांच्या पायांमध्ये तयार झालेल्या रक्ताच्या गाठी यामुळे ही शस्त्रक्रिया करणे अतिजोखमीचे होते. शिवाय चोपडा येथे दोनदा त्यांना भूल देण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले होते. आताही त्यांना शस्त्रक्रियेसाठी भूल देणे हे अतिशय जिकिरीचे होते.
अनेक अडचणी असताना या सर्व जोखमींवर मात करत डॉक्टरांनी अतिशय कौशल्याने शस्त्रक्रिया पार पाडली. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण महिलेवर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते तर काही दिवसातच रुग्ण महिला अगदी ठणठणीत झाली. रुग्णाच्या नातेवाईकांनी देवकर रुग्णालयाचे आभार मानत येथील अद्ययावत वैद्यकीय सुविधांचे कौतुक केले
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम