रशियाने युक्रेनच्या युद्धाचा परिणाम सोने आणि चांदीच्या किमतीत हजारोंची वाढ

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २५ फेब्रुवारी २०२२ | रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी हल्ल्याच्या बातम्यांमुळे जगभरातील शेअर बाजारांत प्रचंड घसरण सुरू आहे. तिसऱ्या महायुद्धाच्या भीतीने गुंतवणूकदार घाबरले आहेत. गुरुवारी, बाजारात सोन्या-चांदीच्या दरात जोरदार उसळी पाहायला मिळाली.

आज भारतीय सराफा बाजारात सोने-चांदी दरात मोठी वाढ झाली आहे. आज सोने दरात तब्बल १,६५६ रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीचा भाव २,३५० रुपयांनी वधारला आहे. सोने आणि चांदी चांगलीच महाग झाली असून सुरुवातीच्या व्यवहारातच सोने 1200 रुपयांपेक्षा महाग झाले असून चांदीच्या दरातही 1500 रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे. आज जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१,५६० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा ६६,१०० रुपये प्रति किलो इतका आहे.

रशिया-युक्रेन संकटाचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावरही दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात 4 ते 5 हजारांची वाढ दिसून येते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like