आमदार संजय शिरसाठ यांना ह्रदयविकाराचा झटका

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १८ ऑक्टोबर २०२२ | बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार संजय शिरसाठ यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावर मुंबईतल्या लिलावती रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट हे एयर अँब्युलन्सने मुंबईत दाखल झाले असून शिरसाट यांना विशेष एअर एम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आले. . औरंगाबादमध्ये सोमवारी शिरसाट यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र औरंगाबादमधील रुग्णालयातून शिरसाट यांना आता मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विमानतळावरील रुग्णवाहिकेतून त्यांना बाहेर आणण्यात आलं. त्यानंतर एका खासगी कार्डियाक रुग्णावाहिकेत त्यांना शिफ्ट करण्यात आले. . या कार्डियाक रुग्णवाहिकेतून त्यांना आता वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like