म्हातारीच्या डोळ्यात स्प्रे मारून तरुणीला पळवली
खान्देश लाईव्ह | १८ ऑक्टोबर २०२२ | फैजपूरातील प्रांत कार्यालयाजवळून जाणाऱ्या वृद्ध महिलेच्या डोळ्यात स्प्रे मारून सोबत असणाऱ्या तरुणीला पळवून नेल्याची धक्क्कादायक घटना १७ रोजी येथे घडली असून स्प्रे मारणाऱ्या युवकाने पंजाबी ड्रेस परिधान केला असल्याचे माहिती आली आहे.
दि. १७ रोजी निर्माला जैन वय ६० ह्या आपली नात कोमल राजेंद्र शिंपी (वय २२) सोबत बस स्थानकाजवळील प्रांत कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात असताना एक अज्ञात इसम पंजाबी ड्रेस घालून आला व त्याने निर्माला जैन यांच्या डोळ्यावर स्प्रे मारत २२ वर्षीय नात कोमलला पळवून नेले. या प्रकरणी निर्माला जैन यांनी तत्काळ पोलीस स्थानक गाठत घडलेली माहिती दिली. याप्रकरणी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ रवींद्र मोरे हे करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम