जळगावात बसला अपघात ; ३८ प्रवासी जखमी
खान्देश लाईव्ह | १८ ऑक्टोबर २०२२ | पुढे चालणाऱ्या कंटेनरच्या वेग कमी झाल्याने मागून येणाऱ्या बसने दिलेल्या धडकेत बसमधील ३८ प्रवासी जखमी झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुली येथे घडली . जखमींना उपचारासाठी दवाखाण्यात हलविण्यात आले आहे.
जळगाव भुसावळ बस क्रमांक (एमएच २० बीएल ९४७) घेवून चालक देवेंद्र पाटील हे भुसावळकडे जाण्यास निघाले. याबसमध्ये विद्यार्थ्यांसह वृध्द प्रवाशी व नोकरदार यांनी भरगच्च भरलेली होती. इच्छादेवी मार्गे भुसावळच्या दिशेने जात असतांना अजिंठा चौकाजवळील ममता हॉस्पिटल जवळ पुढे जात असलेल्या कंटेनरने आपला वेग कमी केल्याने मागून भरधाव वेगाने येणारी बसने कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील ३८ प्रवाशी जखमी झाले आहे.
जखमी प्रवाशांची नावे – विजया उत्तम सुरवाडे(वय-४०, रा.नशिराबाद), रघुनाथ झुलाल पाटिल(वय-७०,चोपडा), लटकू विठ्ठल पाटिल(वय-६८,रा.पचोरा), चंद्रसिग बाबुलाल पाटिल(वय-३६), यामीनी पाटिल(वय-१६), योगिनी पाटिल(वय-१७), आरती माळी(वय-१६), शुभांगी नेमाडे(वय-१७), दिपाली अनिल माळी(वय-१७), हेमांगी सुभाष माळी(वय-१७), शुभांगी भावसार(वय-१८), शुभदा भावसार(वय-१७), रोहन कैलास सोनवणे(वय-२०), रतन सोनवणे(वय-३५, कवठळ), सरफराज शहा रज्जाक शहा(वय-५७,रा.नशिराबाद), अमीत चौधरी(वय-१६), जयेश अनिल झुंझारवाल(वय-२५,जळगाव), विजय रमेश इंगळे(वय-२०), नरेंद्र दिवाणसिंग पाटिल(वय-४५), पुजा मधुकर महाजन(वय-२०), नुतन पाटिल(वय-१७), रत्नदिप बोदडे(वय-२०), रेणुका संदिप भंगाळे (वय-१९), नुतन पाटिल(वय-१६), भावना फेगडे(वय-१६), बारकु विठ्ठल राजपुत(वय-६५), युसूफअली (वय-६५) सर्व रा. नशिराबाद, साक्षी राजेश गुंजाळ(वय-१७,रा.भुसावळ), भारती रविंद्र इंगळे (वय-४५,रा.नशिराबाद), धनश्री हरिष सैंदाणे(वय-२१,रा.भुसावळ), यांच्या व्यतिरीक्त देान गंभीर जखमी आणि इतर आठ प्रवासी खासगी दवाखान्यात रवाना झाले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्या गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम