टीआरएस खासदाराच्या ईडीची ८० कोटींच्या मालमत्तेवर टाच
खान्देश लाईव्ह | १७ ऑक्टोबर २०२२ |तेलंगणा राष्ट्रीय समिती पक्षाचे खासदार नामा नागेश्वर राव आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या 80.65 कोटी रुपयांच्या 28 स्थावर मालमत्ता आणि इतर मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे. राव यांच्यावर मनी लॉंडरिंग प्रकरणात या आधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ईडीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, हे प्रकरण पीएमएल कायदा 2022 च्या तरतुदींनुसार रांची एक्स्प्रेसवे लिमिटेड, मधुकॉन प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि तिचे संचालक आणि प्रवर्तक यांच्याशी संबंधित आहे.नागेश्वर राव हे मधुकॉन ग्रुप ऑफ कंपनीचे प्रवर्तक आणि संचालक आहेत आणि रांची एक्स्प्रेसवे लि.ने चुकलेल्या बॅंकेच्या कर्जाचे वैयक्तिक हमीदार आहेत. यापूर्वी जुलै 2022 मध्ये, ईडीने मधुकॉन ग्रुप आणि खासदार नागेश्वर राव तसेच या कंपनीचे संचालक आणि प्रवर्तक यांच्या मालकीच्या 105 स्थावर मालमत्ता आणि 73.74 कोटी रुपयांच्या इतर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम