लखनौच्या एका आश्रमात साध्वीवर सामूहिक अत्याचार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १७ ऑक्टोबर २०२२ | उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या एका आश्रमात साध्वीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चार साधकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आश्रमात राहायचं असेल तर हे सर्व सहन करावं लागेल अशी धमकी या आश्रमाच्या महंताने दिल्याचा आरोपही पीडितेने केला आहे.

पीडिता ही मूळची प्रयागराज येथील करछनाची रहिवासी आहे. ती पूर्वी साध्वी म्हणून मथुरेच्या रुक्मिणी बिहार आश्रमात राहत होती. एक वर्षापूर्वी ती प्रयागराजमधील माघ यात्रेसाठी गेली होती. तिथे तिची भेट एका साध्वीशी झाली. त्या साध्वीने तिला सांगितलं की ती लखनौच्या गोमतीनगर येथे जानकी मंदिर आश्रमात राहते. यात्रा संपल्यानंतर त्या दोघींमध्ये चांगली मैत्री झाली. त्यामुळे श्रावणात सदर साध्वीने पीडितेला सांगितलं की तिच्या आश्रमातील महंतांनी तिला (पीडितेला) आश्रमात राहण्यासाठी आमंत्रित केलं आहे. त्यानंतर पीडिता लखनौच्या आश्रमात राहायला आली.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like