पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा १४ रोजी संपन्न

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १७ ऑक्टोबर २०२२ | जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव दिनांक 14 ऑक्टोंबर, 2022 रोजी औदयोगीक प्रशिक्षण संस्था (आय.टी. टाय) मेस हॉल, नॅशनल हायवे नं.6 जळगांव येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

या मेळाव्यासाठी एकूण 19 औदयोगिक/खाजगी आस्थापनांनी 10 वी पास/ 12 वी पास, आय टि आय, डिप्लोमा धारक, पदवीधर आणि इतर शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या होत्या. मेळाव्याचा एकूण 517 उमेदवारांनी लाभ घेतला व विविध आस्थापनांच्या स्टॉलवर भेटी देऊन मुलाखती दिल्या त्यापैकी एकूण 121 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यांत आलेली असून अंतिम निवडीची कार्यवाही सुरु आहे..
मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मा. उप-प्राचार्य यांनी आपले मनोगत व्यक्त करुन उपस्थित उमेदवारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे विभागाच्या रोजगार कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नातून आयोजित केलेल्या मेळाव्याचा समारोप करण्यांत आला असे सहायक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता, जळगाव श्री. वि.जा. मुकणे, यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like