अडावद येथे जुगार अड्ड्यावर धाड ३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १७ ऑक्टोबर २०२२ | शेतात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी १७ रोजी मध्यरात्री सुरु असलेल्या टाकलेल्या छाप्यात सुमारे ३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून यामुळे जुगाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, तालुक्यातील अडावद येथील अलीम अली जहुर अली काझी यांच्या शेतात अवैधरित्या जुगार सुरु असल्याची माहिती अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे हे आठ दिवस रजेवर गेले असल्याने जळगाव नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मोताळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अलीम अली जहूर अली काझी यांच्या शेतात अनेक वर्षांपासून पत्त्यांच्या क्लब सुरू असल्याने या क्लबवर श्री मोताळे यांनी त्यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांसह दि. 17 रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास शेतात जाऊन यांच्या पत्त्याच्या क्लबवर धाड टाकली असता चार मोटार सायकलीसह रोख रकमेसह तीन लाख 71 हजार 630 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

त्यात एक लाख 75 हजार रुपये रोख रक्कम जमा करण्यात आल्याचे समजते . अलीम अली जहुर अली काझी, भाऊसाहेब प्रकाश पाटील, विनोद भगवान पाटील, दीपक रघुनाथ जोशी, जुनेद शेख फिरोज, रामचंद्र रुपचंद्र महाजन ,अरुण वामन पाटील, इक्बाल शहा मोसा शहा ,लीलाधर कैलास साळुंके ,लीलाधर कैलास साळुंखे, रमाकांत विठ्ठल डोळे, भरत शालिक ,भिल जिगर, सुरेश कोळी, प्रवीण धुडकू महाजन, यांच्यावर अडावद पोलीस ठाण्यात 164/ 22 कलम महाराष्ट्र जुगार अधिनियमन कलम महाराष्ट्र जुगार अधिनियम 12 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो ना शरीफ तडवी करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like