लेवा पाटीदार बिझनेस एक्स्पोच्या समाधानी वाटचालीबद्दल स्नेहमेळावा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १७ ऑक्टोबर २०२२ | गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग येथे गोदावरी फाऊंडेशनच्या वतीने लेवा पाटीदार ग्लोबल सोशल फाऊंडेशन व लेवा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ऍग्रीकल्चर आयोजित लेवा बिझनेस एक्स्पो २०२२ चा सर्व उद्योजकांना तसेच सर्व आयोजक यांच्यासाठी श्रमपरिहार स्नेहभोजनाचा सोहळा आयोजित केला होता.

या मेळाव्यात अनेक व्यावसायिकांनी लेवा पाटीदार बिझनेस एक्स्पो बद्दल समाधान व्यक्त केले. यात आमच्या उत्पादनाला खूप छान प्रतिसाद मिळाल्याचेही आनंददायी उद‍्गार काढले. या मेळाव्यात गोदावरी फाऊंडेशन अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना सर्व उद्योजकांना आणि उद्योगाला प्रोत्साहन करून अनेक उदाहरण दाखल करत व प्रेरित केले. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्य डॉ.केतकी पाटील, हृदयविकार तज्ञ डॉ.वैभव पाटील, मलकापूर येथील प्रसिद्ध सर्जन डॉ.सुहास बोरोले, अनिकेत भालचंद्र पाटील, लेवा पाटीदार ग्लोबल फाऊंडेशनचे पदाधिकारी चंदन कोल्हे, महेश चौधरी, बिपीन पाटील, भूषण बढे, हितेंद्र धांडे, रुपेश सरोदे, जयेश भंगळे, अमेय तळले, जयश्री पाटील अमोल चौधरी, किशोर महाजन, चंद्रकांत महाजन, निखिल झोपे व ङउउखअ चे नितीन इंगळे, किशोर ढाके लेवा एक्स्पो २०२२ चे सर्व उद्योजक सहपरिवार उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like