‘बालविवाह प्रतिबंध आणि युवकांचा सहभाग’ विषयावर २० रोजी वेबसंवाद
खान्देश लाईव्ह | १७ ऑक्टोबर २०२२ | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 20 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 वाजेदरम्यान ‘ बालविवाह प्रतिबंध आणि युवकांचा सहभाग ‘ या विषयावर वेबसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
युनिसेफच्या राज्य सल्लागार डॉ.सरिता शंकरन् ‘ बालविवाह प्रतिबंध आणि युवकांचा सहभाग ‘ या विषयावर संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ. अनिल चिकाटे हे.असतील. वेबसंवादाचे मुख्य आयोजक विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. सुधीर भटकर, युनिसेफच्या संवाद विशेषतज्ज्ञ स्वाती मोहपात्रा, माध्यम सल्लागार श्रुती गणपत्ये तर सहआयोजक डॉ.विनोद निताळे, डॉ.गोपी सोरडे, डॉ.सोमनाथ वडनेरे हे आहेत.
हा वेबसंवाद झूम अॅपवर घेण्यात येणार आहे. वेबसंवाद सर्वासाठी नि:शुल्क असून यात सहभागी होण्यासाठी झूम आयडी 9423490044 व mcj111 हा पासवर्ड वापरून लॉगिन करता येईल. वेबसंवादमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मुख्य आयोजक तथा विभागप्रमुख प्रा.डॉ. सुधीर भटकर यांनी केले आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम