जिल्हा दूध संघाच्या लोणी व पावडर अपहारप्रकरणी गुन्हा दाखल
खान्देश लाईव्ह | १७ ऑक्टोबर २०२२ | जिल्हा दूध संघातील सुमारे सव्वा कोटी रुपये किमतीचे लोणी आणि दूध पावडरच्या अपहारप्रकरणी अखेर जळगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलीस स्थानकाचे सपोनि संदीप परदेशी यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.
भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी दूध संघात सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचं 14 टन लोणी आणि 9 टन दूध पावडरचा अपहार झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती.तसेच दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी देखील पोलिसांना या प्रकरणात जबाब देताना दूध संघात सुमारे सव्वा कोटी रुपयांचं 14 टन लोणी व 9 टन दूध पावडरचा अपहार झाल्याचा जबाब पोलिसांना दिला होता.
सपोनि संदीप परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 11 ऑक्टोबर 2022 रोजी आमदार मंगेश रमेश चव्हाण (चाळीसगाव) यांनी पोलिस अधिक्षक यांना अर्ज दिला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ येथुन सुमारे चौदा टन बटर (लोणी) 8 ते 9 टन म्हशीच्या दुधाची भुकटी (निल्क पावडर ) सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये मालाची परस्पर विल्हेवाट लावुन टाकण्यात आलेली आहे. सदरची विल्हेवाट ही जळगांव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाचे चेअरमन, कार्यकारी संचालक काही मोजके कर्मचारी यांनी अंत्यत हुशारीने व नियोजन पद्धतीने लावलेली आहे. सदरचा अर्ज हा सी.आर.पी.सी 154 अन्वये फीर्याद नोंदवावी याबाबत अर्जात नमुद केलेले होते.
तसेच मनोज गोपाळ लिमये (वय 59 वर्ष, धंदा – नोकरी, रा. दुधसंघ कॅंपस जळगाव) यांचा दि.12 ऑक्टोबर 2022 रोजी जबाब नोंदविला असता त्यांचे सांगणे की, ते जळगाव सहकारी दुधसंघ येथे कार्याकरी संचालक म्हणुन सन मार्च 2022 पासुन कार्यरत असुन त्यांच्यावर नियंत्रण हे संचालक मंडळाचे असल्याने दुधसंघाची संपुर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे. सदर दुधसंघात शेतकरी यांचेकडून दुध संकलीत करुन दुधापासुन अनेक दुग्धजन्य पदार्थ बनविले जातात. व ते ब्रेडींग करुन ते मार्केटमध्ये वितरीत केले जाते.
दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 9.30 वाजता मनोज लिमये यांनी संदिप झाडे, स्वप्निल जाधव, नितिन पाटील, महेद्र केदार यांनी विक्री विभागातील प्रत्यक्ष पांढऱ्या लोण्याचा साठा तपासणीचे निर्देश दिले असता त्यांच्या तपासणीत दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी 14 टन पांढरे लोणी अंदाजे किंमत 70 से 80 लाख रुपये संघाच्या बाहेर वाई (जि. सातारा) येथे शितगृहात पाठविल्याची नोंद साठा रजिस्टरमध्ये घेण्यात आलेली आहे. परंतु असे प्रत्यक्षात कोणतेही वाहन नमुद साठा घेवुन दुधसंघाचे बाहेर गेलेले नाही. याची इन व आउट गेटमध्ये नोंद नाही, तरी तपासणीत दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात आलेली नोंद ही खोटी असल्याचे तपसणी पथकाच्या निदर्शनास आलेले आहे. तसेच तपासणी पथकास अभिलेखानुसार 9 मॅट्रीक टन दुध पावडरची तफावत आढळुन आली असुन त्याची कींमत अंदाजे 30 ते 35 लाख रुपये आहे असे एकंदरीत 1 कोटी 15 लाख रुपयेचा अपहार झालेला आहे असे मनोज लिमये याची तक्रारीत नमुद आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपासात समोर आले की, कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी या प्रकरणात ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित केले, त्यांच्या निलंबन आदेशात अपहार नमूद केल्याचे म्हटले आहे. हाच मुद्दा लक्षात घेऊन पोलिसांनी दूध संघाची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दूध संघातील जबाबदार संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम