अंधेरी पोटनिवडणूकीतून भाजपची माघार
खान्देश लाईव्ह | १७ ऑक्टोबर २०२२ | शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पोटनिवडणूकीतून भाजपने माघार घेतली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हि माहिती दिली आहे.
भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे त्यांचा अर्ज मागे घेणार असल्याचे बानवकुळे यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम