राज ठाकरे यांच्या वक्तव्या चौकशी करुन गुन्हा दाखल करा ; वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन दिली तक्रार

बातमी शेअर करा

मुंबई : मराठी अस्मिता, मराठी पाट्या, भाषा तसेच प्रादेशिक घुसखोरी या मुद्द्याना बगल देत  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या काही दिवसात हिंदु-मुस्लिम विवादाकडे आपला अजेंडा फिरवला आहे आणि दोन समाजात संदेहाचे वातावरण निर्माण करुन तेढ वाढवणारे वक्तव्य करीत आहे. यावर कठोर आक्षेप घेत वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन खान आणि महासचिव आनंद जाधव यांच्या शिष्टमंडळाने आज (७ एप्रिल) मुंबईत पोलीस आयुक्तालयात पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली आणि राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्या बाबत तक्रार अर्ज सुपूर्द केला.

शिवाजीपार्कयेथे 3 एप्रिल रोजी  गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात झोपडपट्टीतील मदरशां बाबतीत अतिशय गंभीर वक्तव्य करत ते म्हणाले की, “झोपडपट्टीतील मदरशां आणि मस्जिदी मध्ये समाज विघातक गोष्टी घडतात असे पोलिस खाजगीत सांगतात या मशीदी व मदरशांवर धाडी टाका काय काय सापडेल ते पाहून धडकी बसेल” असे संदिग्ध वक्तव्य केले होते आहे. पोलिसांमार्फत एकांतात कानोसा घ्या काय काय माहीती मिळेल असे ही बोलले.

या वक्तव्याची दखल घेऊन पोलिस विभागाने राज ठाकरेंकडे खाजगीत बोलणा-या पोलीसांची यादी व इतर सोर्सेस उपलब्ध करुन घेऊन रितसर चौकशी करावी आणि काही गैरकृत्य आढळून आलेतर कडक कारवाई करावी परंतु जर यात काही तथ्य आढळले नाही तर राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये जे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि धार्मिक तेढ निर्माण करून जे दंगे घडवण्याचा कट रचण्याचा प्रयत्न दिसुन येत आहेत त्यानुसार राज ठाकरेंवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा व UAPA कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारची तक्रार अर्जात नमूद केली आहे.

पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शिष्टमंडळाला हे विश्वास दिला आहे की कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार मुंबईत तसेच विशेष समूहांसोबत होऊ देणार नाही. समाज कंटक तसेच विघ्नसंतोषी वृत्तीवर मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस टाच ठेवून आहे.

याप्रसंगी महासचिव आनंद जाधव, ॲड. सतीश शिंदे, मुंबई महासचिव मुस्लिम आघाडी सय्यद मनजू, मुंबई उपाध्यक्ष मुस्लिम आघाडी मनिहार हुसेन, मुंबई निरीक्षक मुस्लिम आघाडी अब्दुल बारी खान, महोम्मद अर्शद निजामी यांच्या शिष्टमंडळाने ही भेट घेतली होती.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like