रोटरी गोल्डसिटी, ऍडव्हॉन्स बायो ऍग्रोतर्फे महात्मा गांधी विद्यालयास ८० बेचेंस प्रदान

बातमी शेअर करा

जळगाव : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीतर्फे भादलीच्या महात्मा गांधी विद्यालयास मूळ जळगावचे रहिवासी असलेले व चेअरमन मुकुंद काबरा यांच्या ऍडव्हॉन्स बायो-ऍग्रोटेक लि. ठाणे या कंपनीच्या सीएसआर निधीतून ८० बेचेंस विद्यार्थ्यांसाठी देण्यात आले.

यावेळी रोटरीचे सहप्रांतपाल विष्णू भंगाळे, प्रेसिडेंट एन्क्ल्यु चेअरमन लक्ष्मीकांत मणियार, रुरुल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गोविंद महाजन, सचिव सुनील नारखेडे, सहसचिव राजेंद्र कोल्हे, गोल्डसिटीचे अध्यक्ष उमंग मेहता, मानद सचिव डॉ.निरज अग्रवाल यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्या या भावनेने ठाणे येथील मुकुंद काबरा यांनी त्यांची जन्मभूमी असलेल्या जळगाव जिल्ह्यात सामाजिक भावनेने कंपनीच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला असून भविष्यातही अधिक काम करण्याचा त्यांचा मनोदय असल्याचे अध्यक्ष उमंग मेहता यांनी बोलतांना सांगितले. सहप्रांतपाल भंगाळे यांनी रोटरी गोल्डसिटीच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमास रोटरी गोल्डसिटीचे नंदू आडवाणी, सतीश मंडोरा, प्रकल्प प्रमुख निखील रेदासनी, निलेश जैन, प्रखर मेहता, गोविंद मणियार, संदीप जैन, चंदर तेजवाणी, प्रकाश पटेल, अशोक जैन, शाळेचे संचालक मधुकर झांबरे, सुधाकर नारखेडे, यशवंत खाचणे, घनश्याम नारखेडे, विनायक महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.प्रास्ताविक मुख्याध्यापक डी.के.धनगर यांनी तर सूत्रसंचालन प्रज्ञा नारखेडे यांनी केले. एस.पी.ठाकूर यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी रोटरी गोल्डसिटीचे सदस्य व शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like