महागाईचा झटका; गॅस सिलिंडर पुन्हा महागला, ‘हे’ आहेत नवे दर

खान्देश लाईव्ह | 06 जुलै 2022 | जनतेला महागाईचा पुन्हा मोठा झटका बसला आहे. 14.2 किलोचा घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर आता महागला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
आता तर महागाईने सर्वसामान्य नागरिकाचे कंबरडे मोडले आहे. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत तसेच इंधनापासून ते खाद्य तेलापर्यंत सर्वच वस्तुंचे दर वाढले आहेत.
घरगुती गॅस सिलिंडरचे नवे दर आजपासून लागू झाले असून, आता 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 1053 रुपये मोजावे लागणार आहेत. गॅस सिलींडरच्या दराने हजार रुपयांचा टप्पा ओलांडल्याने याचा मोठा ताण आता सर्वसामान्य जनतेच्या खिशावर पडत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम