ई-श्रम कार्डच्या माध्यमातून कामगारांच्या ऋणातून उतराई – माजी आ. राणा दिलीपकुमार सानंदा
कामगार दिन व वाढदिवसाचे औचित्य साधून माजी आ. राणा दिलीपकुमार सानंदा यांनी षेकडो कामगारांना दिला श्रममुल्यांचा मोबादला.
०२ मे २०२२ । खान्देश लाईव्ह । खामगांव विधानसभा मतदार संघाचे सलग ३ वेळा नेतृत्व करतांना कामगार आणि त्यांच्या परिवारांनी भरभरुन प्रेम व मतदान रुपी आषिर्वाद देवुन सहकार्य केले.कामगारांचे प्रेम आजही आपल्यावर आणि कॉंग्रेस पक्षावर कायम आहे. कोरोना आपत्ती काळातही आपण कामगारांना अन्नधान्य किटच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न केला. खामगांव षहर व परिसरामध्ये रोजंदारीने हातमजुरी करुन तळहातावर पोट भरणारे अनेक असंघटीत कामगार बांधव आहे. या कामगार बांधवांना ई-श्रम कार्डच्या माध्यमातून षासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा याकरीता असंघटीत गोर गरीब कामगारांना मोफत ई-श्रम कार्ड काढून देण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हा उपक्रम म्हणजे कामगारांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न असल्याची ग्वाही माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.
दि.०१ मे २०२२ रोजी महाराश्ट्र दिन,कामगार दिन व मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोहन चौक भागात असंघटीत कामगार बांधवांसाठी भव्य ई-श्रम कार्ड षिबीर आयोजित करण्यात आले होते.या षिबीराचे उद्घाटन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून खामगांव महसुलचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, खामगांवचे अतिरिक्त उपविभागीय अधिकारी विजय पाटील, तहसिलदार अतुल पाटोळे, षेगांवचे तहसिलदार समाधान सोनवणे, नायब तहसिलदार हेमंत पाटील,मा.नगराध्यक्ष राणा अषोकसिंह सानंदा,माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा,माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,महिला कॉंग्रेसच्या षहर अध्यक्षा सौ.सुरजितकौर सलुजा, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष किषोरआप्पा भोसले,मोहनभाऊ परदेसी,प्रितमभाऊ माळवंदे, सौ.षारदाताई षर्मा, कॉंग्रेसचे ज्येश्ठनेते, उद्योजक मधुसुदन अग्रवाल,माजी न.प.उपाध्यक्ष संतोश देषमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, ई-श्रम कार्ड काढण्यासाठी कामगारांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक कामगारांना ई-श्रम काढण्यासाठी बाहेर जवळपास २०० ते २५० रुपये खर्च येतो.मजुरी पाडुन श्रमकार्ड काढणे अनेकांना परवडणारे नसते. म्हणून कामगारांच्या ठिय्यापर्यंत जावुन तिनही ऋतुन राबणाÚया असंघटीत कामगारांप्रती कृतीषिल संवेदना अर्पण करण्यासाठी कामगारांच्या श्रम मुल्यांची जपणूक करण्यासाठी कामगार दिनी ई-श्रम कार्ड षिबीराचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष किषोरआप्पा भोसले यांनी उपस्थित कामगारांना ई-श्रम कार्डचे महत्व समजावून सांगितले.
सर्वप्रथम माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या वाढदिवसानिमित्त संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष किषोरआप्पा भोसले यांनी षाल, पुश्पहार घालुन सत्कार केला व स्मृतीचिन्ह देवुन वाढदिवसानिमित्त अभिश्टचिंतन केले. जनसेवेसाठी आयोजित या षिबीरामध्ये नाव नोंदणीसाठी महिला व पुरुश असंघटीत कामगार बांधवांची मोठया प्रमाणात गर्दी झाली होती.षिबीरामध्ये जवळपास २५० कामगारांनी आपल्या नावाची नोंदणी केली.नाव नोंदणी झालेल्या कामगारांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा व मान्यवरांच्या हस्ते मोफत ई-श्रम कार्ड वाटप करण्यात आले. कामगारांप्रती कृतज्ञता म्हणून मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते कामगार दिनी कामगार बांधवांचा सन्मानपुर्वक गुलाबपुश्प देवुन व लाडु भरवुन सत्कार करण्यात आला व कामगारांना कृतज्ञता निधीचेही वितरण करण्यात आले. हा उपक्रम यषस्वी करण्याकरीता संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष किषोरआप्पा भोसले व प्रितम माळवंदे यांनी विषेश परिश्रम घेतले. ई-श्रम कार्ड काढण्यासाठी रितेष पवार, श्रीकांत राउत, सोनु जाधव, चेतन चंदन, रोहित मारवाल, स्वप्नील धानोकार, आकाष गोमासे यांचे विषेश योगदान लाभले. यावेळी कामगार दिन चिरायू होवो, हम सब एक है अष्या घोशणा देण्यात आल्या.
कार्यक्रमाला धनंजय वानखडे, निलेष भोसले, प्रमोद महाजन, आदित्य राजपुत, माजी नगरसेवक दिनेष अग्रवाल, दिलीप जाधव, अमर पिंपळेकर,प्र मोद मोरे, सौ. प्रमिला चोपडे, श्रीमती सुलोचना कळींगकर, पंकज पुरी, सौ. षारदा षर्मा यांच्यासह भारतीय राश्टीय कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम