जळगावात मुलावर अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अटक

खान्देश लाईव्ह । २ जानेवारी २०२३ । शहरातील शनीपेठ भागात राहणाऱ्या ९ वर्षाच्या मुलावर एका प्रौढाकडून अनैसर्गीक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. प्रकरणात एका तरूणाला अटक करण्यात आली असून शनीपेठ पोलीस ठाण्यात रविवारी १ जानेवारी रोजी रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात ९ वर्षीय अल्पवयीन मुलगा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. अल्पवयीन मुलगा रविवारी १ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास खेळत असतांना त्याच भागात राहणारा शाम गोपाल वर्मा (वय-४५) या प्रौढाने त्याला पतंग उडविण्यासाठी लागणारा मांजाची चक्री देण्याचे आमिष दाखविले. अल्पवयीन मुलाला शाम वर्मा याने त्याच्या घरात बोलावून त्याच्या सोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घरचांच्या लक्षात आल्याने त्यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. पीडीत अल्पवयीन मुलाच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री १० वाजता संशयित आरोपी शाम गोपाल वर्मा याच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रीया दातीर ह्या करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम