जळगावात अपघातामध्ये ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । २ जानेवारी २०२३ । शहरातील सेंट जोसेफ स्कूलजवळ झालेल्या रोड अपघातात प्रौढाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील सायगाव येथील विवेक विश्वासराव सोनवणे (पाटील) (वय -५४) या इसमाचा शहरातील सेंट जोसेफ स्कूल जवळ अपघात घडला. यावेळी झालेल्या अपघातात विवेक सोनवणे याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज रात्री १ वाजेच्या पूर्वी (वेळ निश्चित नाही) घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात वैद्यकीय अधिकाऱ्याच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास दीपक पाटील हे करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like