विवाहितेचा तीन लाखांची छळ ; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । २ जानेवारी २०२३ । जामनेर शहरातील विवाहितेला ३ लाखांसाठी शिवीगाळ व मारहाण करत घरातून हाकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी १ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जामनेर शहरातील राहणाऱ्या पुजा समाधान पाटील (वय-२०) ह्या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सन २०२१ मध्ये त्यांचा विवाह समधान सुदाम पाटील रा. वाकीरोड, जामनेर याच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती समाधान पाटील यांनी विवाहितेला माहेरहून ३ लाख रूपये आणावे अशी मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून शिवीगाळ व मारहाण केली. तसेच सासरे, सासु, जेठ यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला. त्यानंतर विवाहितेला घराबाहेर काढून हाकलून दिले. दरम्यान, विवाहितेने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती समाधान सुदाम पाटील, सासरे सुदाम रमेश पाटील, सासू अशा सुदाम पाटील आणि जेठ गजानन सुदाम पाटील सर्व रा. वाकी रोड, जामनेर यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रियाज शेख करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like