जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यानी केले कळसुबाई शिखर सर

खान्देश लाईव्ह । ३ जानेवारी २०२३ । जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या १९० विध्यार्थ्यानी कळसूबाई हे तब्बल ५ हजार ४०० मीटरचे शिखर सर करीत वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे.
दहा तासांच्या मोहिमेत या विध्यार्थ्यानी कळसुबाई शिखर सर करण्याबरोबरच परतीचा प्रवास पूर्ण करत त्यांच्या शारीरिक क्षमतेचा परिचय करून दिला. या मोहिमेत विध्यार्थ्यानी “छत्रपती शिवाजी महाराज कि जय”, ‘भारत माता की जय’, वंदे मातरमच्या जयघोषात मोहिम फत्ते केली. तसेच शिखरावर चढता चढता ठिकठिकाणी स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली. यावेळी विध्यार्थ्यानी ऑलम्पिक विजेते खेळाडू, सीमेवर लढणारे जवान व शास्त्रज्ञाच्या कार्याला सलाम करत त्यांना मोहीम समर्पित केली. महाराष्ट्रात कळसूबाई शिखराचे गिर्यारोहकांच्या दृष्टीने आगळेवेगळे महत्त्व आहे. गिर्यारोहणाच्या अनेक मोठ्या मोहिमांपूर्वी गिर्यारोहक कळसूबाई सर करण्याचा सराव करतात. अत्यंत आव्हानात्मक मानल्या जाणारे हे शिखर चढण्यापूर्वी अनेक दिवस सराव करावा लागतो. जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यानी प्रा.योगिता पाटील, प्रा. रफिक शेख, प्रा. विनोद महाजन, प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. श्रिया कोगटा, प्रा. रोहित साळुंखे, प्रा करिष्मा चौधरी व प्रकाश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कळसुबाईची मोहिम यशस्वीपणे पूर्ण केली. तसेच विध्यार्थ्यानी ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याने त्यांचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी अभिनंदन केले.
कळसूबाई चढण्याचा अनुभव थरारक होता. खास गिर्यारोहकांची वाट म्हणून ओळखली जाणारी बारी या रस्त्याद्वारे मोहिमेला सुरुवात झाली. सकाळी ९.३० ते १० वाजताच्या सुमारास चढाईला सुरुवात झाली. दुपारी २.३० वाजेच्या सुमारास कळसूबाईच्या मोहिमेवर त्यांनी फत्ते मिळविली. रात्री दहा वाजेपर्यंत ते खाली परतले तसेच यावेळी टीम कम्युनिकेशन, नेटवर्किंगची भूमिका, जोखीम घेणे, जागेवरच निर्णय घेणे, रणनीती तयार करणे, क्षमता मॅपिंग, आव्हान हाताळणे, वेळेचे व्यवस्थापन, शिस्तीचे महत्त्व, ऐकण्याच्या कौशल्यांचे महत्त्व, कम्फर्ट झोन तोडणे, शारीरिक मर्यादांवर मानसिक ताकद असणे यासारख्या विविध बाबी विध्यार्थ्यानी आत्मसात केल्या असे प्रा. योगिता पाटील यांनी सांगितले. या मोहिमेदरम्यान मोठ्याप्रमाणात थंडी होती. परतीच्या वेळी दाट अंधार होता. मात्र विध्यार्थ्यानी कुठेही न डगमगता हि मोहिम यशस्वीपणे पार केली.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम