महिलेची ७६ हजार रुपयांत आर्थिक फसवणूक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । ३ जानेवारी २०२३ । गृहकर्जाची फाइल मंजूर करुन देतो, अशी खोटे आश्वासन देत कासोदा येथील एकाने पाचोऱ्यातील महिलेची ७६ हजार रुपयांत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा शहरातील गिरड रोडवरील भवानी नगर भागातील रहिवासी रेखा संजय पाटील (वय४२) या महिला किराणा दुकान चालवून आपल्यासह परिवाराचा उदरनिर्वाह चालवतात. रेखा पाटील यांनी नवीन घर बांधण्यासाठी गृहकर्ज काढण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील धान्य मार्केट समोर राहणाऱ्या कुणाल सुनील चौधरी याने रेखा पाटील यांची गृह कर्जाची फाइल मंजुर करुन देतो, असे सांगून त्यांच्याकडून १८ मे २०२२ ते २५ मे २०२२ या कालावधीत टण्या टप्प्याने ऑनलाइनच्या माध्यमातून तसेच ५५ हजार रुपये रोख असे एकूण ७५ हजार ९०० रुपये घेतले. परंतू त्यानंतर रेखा पाटील यांनी वारंवार कुणाल चौधरी याच्याकडे गृह कर्जाच्या फाइलबद्दल चौकशी केली. पण कर्ज मिळत नसल्याने त्यांनी दिलेली रक्कम परत करावी, अशी मागणी केली. परंतु कुणाल चौधरी याने पैसे परत न दिल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रेखा पाटील यांनी पाचोरा पोलिस ठाणे गाठून कुणाल चौधरी याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like