धावत्या रेल्वे मधून पडल्याने एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । ३ जानेवारी २०२३ । कजगाव रेल्वेस्थानकानजीक धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एका अनोळखी व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवार, 2 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

कजगाव रेल्वे स्थानकानजीक रेल्वे कि. मी. खंबा क्रं. 346 / 11 / 13 दरम्यान डाऊन लाईनवर कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली सापडुन एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रास मिळाल्यानंतर पोलिस हवालदार मधुसूदन भावसार व रुग्णवाहिका चालक अमोल पाटील हे घटनास्थळी दाखल होवून मधुसूदन भावसार यांनी घटनास्थळा सविस्तर पंचनामा केला असता मयताचे अंदाजे वय 40 वर्ष असून ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
===========

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like