सोमालियात बॉंम्बस्फोटात १०० जण ठार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३० ऑक्टोबर २०२२ | सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये झालेल्या दोन कार बॉम्बस्फोटात किमान १०० जण ठार झाले आहेत.

सोमालियातील शिक्षण मंत्रालयाबाहेर ही घटना घडली. सोमालियाचे अध्यक्ष हसन शेख यांनी एका निवेदनात या वृत्ताला दुजोरा दिला असून या घटनेत आतापर्यंत 300 लोक जखमी झाले आहेत. सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये शनिवारी, 29 ऑक्टोबर रोजी दोन कार बॉम्बस्फोट झाले. ज्यात 30 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. तर आता मृतांची संख्या 100 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर या हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेनं स्वीकारलेली नाही.

राष्ट्रपतींनी या दहशतवादी संघटनेला जबाबदार असल्याचं सांगितलं अध्यक्ष हसन शेख महमूद यांनी दहशतवादी संघटना अल-शबाबला जबाबदार धरत या हल्ल्याला भ्याड म्हटलं आहे. दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्यासाठी देशाचे राष्ट्रपती सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत असताना हा हल्ला झाला आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like