पाचोरा येथे रामकथेनिमित्त कलशाची मिरवणूक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३० ऑक्टोबर २०२२ | येथे दि. २ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान रामकथा वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज रविवार दि.३० नोव्हेंबर रोजी शहरात कलश मिरवणूक काढण्यात आली.

दि. २ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान हिवरा नदी तीरावरील श्रीराम मंदिरात सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत राम कथेचे वाचन वृंदावन येथील साध्वी स्वेतांबारी महाराज हे करणार आहेत. त्यांना हरीव्दार येथील विष्णुदासजी महाराज, निळकंठ महाराज यांचेसह अनेक साधू, महंत सहकार्य करणार आहेत. दरम्यान दि. ३० आॅक्टोबर पासून दि. ९ नोव्हेंबरपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने रविवारी श्रीराम मंदिरापासून ते जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वल्लभभाई पटेल रोड, देशमुखवाडी, सराफ बाजार मार्गे श्रीराम मंदिरापर्यंत कलशाची मिरवणूक काढण्यात आली. विष्णूदास महाराज, निळकंठ महाराज, अरविंद खंडेलवाल, अलुल शर्मा, राधेश्याम दायमा, पार्थ खंडेलवाल, डी. एस. पाटील सह मोठ्या संख्येने भाविक कलश मिरवणुकीत सामील झाले होते. पाचोरा तालुका व शहरातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रामकथा वाचनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like