अन.. मृत झालेला तरुण तिरडीवरून उठून बसला… !
खान्देश लाईव्ह | २७ ऑक्टोबर २०२२ | डॉक्टरांनी तरुणाची नस पाहून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितल्याने नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची तयारी केल्यानंतर त्याला तिरडीवरून नेत असताना तिरडी अचानक हलू लागल्याने तिरडी एका मंदिरात ठेवल्यानंतर तो अचानक उठून बसल्याने उपस्थितांना धक्काच बसला .
तर त्याच्या अंगात दैवी शक्तीचा संचार असल्याच्या वार्तेने तरुणाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गर्दीला आवरताना पोलिसांनाही नाकेनऊ आले. प्रशांत मेशरे असे या मृत समजल्यागे;गेलेल्या तरुणाचे नाव असून हि घटना अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या विवरा गावात घडली आहे.
प्रशांत मेशरे हा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले . बुधवारी तो अत्यवस्थ झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. नस चोक अप झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले . २५ वर्षांच्या तरुण मुलाच्या मृत्यूने कुटुंबीय हवालदिल झाल्याने हा आघात पचवून त्यांनी प्रशांत यांच्या अंत्यसंस्काराची तयारी केली होती.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम