इराणच्या शिराज शहरात दहशतवादी हल्ल्यात १५ जण ठार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २७ ऑक्टोबर २०२२ |इराणमधील शिराज शहरामध्ये तीन दहशतवाद्यानी हल्लाकेल्याने या हल्ल्यात १५ जण ठार झाले आहेत. आहे तर ४० जण जखमी झाले . मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यापैकी हल्लेखोर दोन दहशतवाद्यांना पकडण्यात यश आले आहे. एकाचा अद्याप शोध सुरु आहे. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, शिराज शहरातील शिया तिर्थावर तीन बंदूकधाऱ्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. शिया तिर्थस्थळावर मोठ्या प्रमाणात भाविक आले होते, त्यावेळी दहशतावाद्यानं अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला तर ४० जण जखमी झाले आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like