अमरावती येथे इमारत कोसळून ५ जण ठार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३० ऑक्टोबर २०२२ | अमरावती येथील प्रभाग चौकात दोन मजली इमारत कोसळल्याने पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली सहा ते सात जण अडकले होते. त्यानंतर स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या मदतीने त्यातील पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीसआणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ही धोकादायक इमारत पाडण्यासाठी महानगरपालिकेने यापूर्वीच नोटीस बजावली होती असे सांगितले जात आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like