अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म ; गुन्हा दाखल
खान्देश लाईव्ह । ३१ डिसेंबर २०२२ । भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीशी १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने पळून जावून लग्न केले. एवढेच नव्हेत तर अत्याचारातून अल्पवयीन मुलीने मुलाला जन्म दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भडगाव तालुक्यातील एका गावात राहणारा १६ वर्षीय मुलाने पुणे जिल्ह्यातील एका गावात राहणारी १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत एका मंदीरात जावून लग्न केले. मुलगी ही अल्पवयीन असतांना तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारातून अल्पवयीन मुलीने मुलाला जन्म दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात भडगाव पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम