आ. जितेंद्र आव्हाड यांना चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी केली अटक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ११ नोव्हेंबर २०२२ | ठाण्यातील विवियन माॅलच्या चित्रपटगृहातील धडगूस घालून प्रेक्षकांना मारहाण करीत ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना आज ठाणे पोलिसांनी अटक केली.

जितेंद्र आव्हाड यांनी आणि सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी 11 नोव्हेंबरला रात्री दहा वाजताचा हर हर महादेव चित्रपटाचा शो स्वःत बंद पाडला. त्यांच्यासह अनेक कार्यकर्ते विवियन माॅलच्या चित्रपटगृहात चालून गेले व त्यांनी चित्रपट पाहू नका असे सांगत प्रेक्षकांना बाहेर काढले. यावेळी प्रेक्षकांना मारहाणही झाली होती.

यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मला पोलिसांनी सांगितलं की, तुम्हाला अटक करावं लागेल. चित्रपटातून संपूर्ण मराठा समाजाचा अपमान केला गेला आहे. शिवाजी महाराजांना बदनाम करण्यात येत आहे. त्याला विरोध करण्यासाठी कारागृहात जावं लागत असेल तर मी सहज जाईल. जामिनासाठी देखील अर्ज करणार नाही, असंही आव्हाड म्हणाले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like