उद्धव ठाकरेंच्या सुसंस्कृतपणाचा गुलाबराव पाटील आणि सत्तारांना धाक होता

बातमी शेअर करा

भास्कर जाधव यांची शिंदे गट व भाजप नेत्यांवर टीका

खान्देश लाईव्ह | ११ नोव्हेंबर २०२२ | भाजपाच्या अनेक नेत्यांनी केलेली वक्तव्य इतकी अश्लाघ्य आणि निषेधार्ह आहेत. त्यात भाजपाच्या बाजूला शिंदेंचा गट जाऊन बसला आहे. गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या सुसंस्कृतपणाचा धाक होता. तो आता राहिलेला नाही. भाजपा कधीकधी आपले विचार दुसऱ्याच्या तोंडून वदवून घ्यायचा प्रयत्न करत असते. म्हणून गुण नाही, पण वाण लागला आहे. शब्द जरी त्यांचे असले, तरी भाजपाचेच शब्दप्रयोग ते करत आहेत”, असं म्हणत भास्कर जाधव यांनी शिंदे गटासोबतच भाजपालाही लक्ष्य केलं आहे.कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे. त्यापाठोपाठ मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा ‘नटी’ असा उल्लेख केल्यावरूनही बराच वाद झाला. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी नवी मुंबईत माध्यमाशी संवाद साधून टीका केली .

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like