यावल तालुक्यातील नदीपात्रातुन अवैधरित्या गौणखनिज वाहतुक करणाऱ्या जप्त वाहनांचे जाहिर लिलाव

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ११ नोव्हेंबर २०२२ | यावल तालुक्यात वाळू चोरी विरोधी पथकांनी नदीपात्रातुन अवैधरित्या गौणखनिजाचे उत्खनन करुन वाहतुक करीत असतांना जप्त केलेल्या वाहन मालकांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारीत करण्यात आलेले आहे. परंतु या वाहनाचे मालक यांनी दंडात्मक कार्यवाहीतील आदेशातील रक्कम शासन जमा केलेली नसल्यामुळे अशाप्रकारची वाहने लिलावाव्दारे विक्री करुन दंडात्मक कार्यवाहीतील रक्कम वसुल करणेकामी 18 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय यावल येथे जप्त केलेल्या वाहनांचे लिलाव करण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त इच्छूक व्यक्ती / संस्थांनी लिलावात भाग घ्यावा. लिलावातील अटी व शर्ती, लिलावात असलेली वाहने, लिलावात हातची किंमत इ. बाबत कार्यालयीन वेळेत तहसिलदार यावल यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार यावल यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like